गुहागर – (तेजस आंबेकर )- गुहागर तालुक्यातील पाहिले खाजगी कोव्हिडं केअर हॉस्पिटल शुंगारतळी येथे 5 ऑक्टोबर सुरू होत आहे.
गुहागर तालुक्यातील 13 डॉक्टरांनी एकत्र येत हे शुंगारतळी कोविड केअर सेंटर हॉटेल रेम्बो या ठिकाणी सुरु केले आहे. तालुक्यातील नागरिकांना कोरोनावर उपचार घेण्यासाठी गुहागर तालुका सोडून इतर ठिकाणी जावे लागत असे अशा वेळी ही सुविधा सुरू झाल्याने तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णावर या ठिकाणी उपचार होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
याठिकाणी सुसज्ज अशी यंत्रसामग्री व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मोबाईल एक्स-रे मशीन, ऑक्सिजन, ॲम्बुलन्स, त्याचबरोबर सायकॉलॉजिकल कौन्सिलिंग अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी 25 कोरोना बधितांवर एकाच वेळी उपचार करण्यात येणार असुन या केव्हीड केअर सेंटरसाठी शुंगारतळी येथील व्यापारी नासीम मालाणी , अरुण गांधी यांनी आर्थिक मदत केली आहे.यामुळे आता चांगल्या उपचारासाठी कोरोना रुग्णांना अन्य शहरात जावे लागणार नाही. चोवीस बाय सात सुरू असणारा 9921989959 हा दूरध्वनी क्रमांक रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.