आबलोली -गुहागर तालुक्यातील आबलोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मैदानात क्रांती महिला ग्रामसंघ आबलोली यांचे वतीने कोरोना जनजागृती मनोरा ऊभारण्यात आला असून आबलोली पंचक्रोशीत हा कोरोना जनजागृती मनोरा आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरला आहे.
हा मनोरा बनवितांना कोरोना महामारीच्या काळात व लॉगडाऊनच्या काळात सर्वांचीच परवड झाली असताना कुणीही घाबरून न जाता. ” माझे कुटुंब माझी जबाबदारी “, ” घरी रहा सुरक्षीत रहा “, “सँनिटायझर व मास्कचा नियमित वापर करा “, ” साबणाने हात स्वच्छ धुवा “, ” दोन व्यक्तीमध्ये एक मिटरचे अंतर राखा “, “आपले घर व आपला परिसर स्वच्छ ठेवा..!”
आदि गंभीर बाबी लक्षात घेऊन सर्वांनी काळजी घ्यावी यासाठीच हा कोरोना जनजागृती मनोरा ऊभारण्यात आला असून महिलांनी कोरोना जनजागृतीची गाणी म्हणून व घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला त्यामूळे सर्वांच्या अंगात चैतन्य संचारले होते. यावेळी क्रांती महिला ग्रामसंघ आबलोलीच्या अध्यक्षा अंजली पालशेतकर , उपाध्यक्षा सुप्रिया पवार , सचिव व कृषी सखी भारती कदम , ग्रामपंचायत सदस्या मिनल कदम , लिपीका कविता पवार ,दिपा काळे , बँक सखी सान्वी पवार , शितल पाटील , आशा सेविका मंजीरी भोसले विशाखा कदम , सरपंच तुकाराम पागडे ग्रामसेेेवक बी. बी. सुर्यवंशी , एस. एम. गोटे , शुभम बाईत , संघमित्रा कदम ,मनिषा कदम आदी उपस्थित होते .