चिपळूण ; तब्बल 16 बैल घेऊन जाणाऱ्या कंटेनरला पकडले

0
275
बातम्या शेअर करा

चिपळूण – जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा हाहाकार सुरु असतानाच या संधीचा फायदा घेत तब्बल 16 बैल कत्तलीसाठी घेऊन जाणारे कंटेनरला चिपळूण पोलिसांनी सापळा रचून दळवटणे येथे ताब्यात घेतले. यापकरणी एका स्थानिकासह तिघांना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

अलिमिया चौघुले (खेर्डी), अतुल अरुण पवार (23, पेठनाका-सांगलीफाटा), दुर्गेश शंकर जाधव (19, इस्लामपूर पेठनाका-सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

चिपळूण तालुक्यातील दळवटणे परिसरातून गुरे वाहतूक केली जाणार असल्याची पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समेद बेग यांनी एक पथक तयार केले. बुधवारी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास हे पथक दळवटणेकडे रवाना याचवेळी गावातून कन्टेनर येताना त्यांना दिसला. त्यास दळवटणे पुलाजवळ थांबवून पोलिसांनी चालकाकडे प्राथमिक चौकशी केली. यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याला कन्टेनरचा मागील दरवाजा उघडण्यास सांगितले असता त्यात दाटीवाटीने 16 बैल भरले असल्याचे दिसून आले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here