शुंगारतळी -गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायत तर्फे गुहागर तालुक्यात कोरोना संक्रमणाच्या काळात सामाजिक भावनेतून कामगिरी बजावणारे, तालुक्यातील डॉक्टर, परिचारिका, पोलीस, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, पत्रकार, आशाताई, तालुक्याचे अधिकारी, व्यापारी आदींचा कोविड योद्धा म्हणून ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सन्मान करण्यात आला.
राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतींना आवाहन करून रोख रक्कम रक्कम देण्याचे जाहीर केले होते. या स्पर्धेमध्ये गुहागर तालुक्यात पाटपन्हाळे ग्रामपंचायत प्रथम क्रमांक प्राप्त केला. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीतर्फे विविध सामाजिक उपक्रम नेहमीच राबवले जातात. कोरोना काळात ग्रामपंचायत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक महत्त्वाचे उपक्रम राबविले होते. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाच्या काळात सामाजिक भावनेतून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या लोकांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान केल्याचे सरपंच संजय पवार यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायतीतर्फे प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन ग्रामपंचायतीच्यावतीने गौरव केला केला .
यावेळी डॉक्टर राजेंद्र पवार,पोलीस उपनिरीक्षक रविकिरण कदम , गुहागरचे गटविकास अधिकारी भोसले ,सरपंच संजय पवार, ग्रामपंचायत सदस्य,नसीम मालाणी, गुलाम तांडेल, डॉक्टर मडके,यांच्या सह सर्व पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.