महाड ;कारमध्ये गुदमरून दोन सख्ख्या चिमुरड्या भावांचा मृत्यू

0
175
बातम्या शेअर करा

पोलादपूर -(शैलेश पालकर )- मुंबई-गोवा महामार्गावरील महाड औद्योगिक वसाहतीच्या शेजारी एका बंद होंडा सिटी कारमध्ये गुदमरून दोन सख्ख्या चिमुरड्या भावांचा मृत्यू झाला आहे. सोहेल खान (वय ५ वर्ष) आणि अब्बास खान (वय ३ वर्ष) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. या घटनेबाबतची माहिती औद्योगिक वसाहत पोलीसांनी दिली आहे.

महाड नांगलवाडी येथे एक भंगाराचा अड्डा आहे. येथे एक होंडा सिटी नंबर एम. एच. o४ बि. के. ७५३७ ही बंद कार उभी होती. या कारमध्ये ७ वाजण्याच्या सुमारास खेळत असताना अब्बास व सोहेल यांच्या हातून अचानक गाडीचा दरवाजा आतून लॉक झाला. या दोघांनाही बंद गाडीचे दरवाजे आणि काचा उघडणे जमले नाही. यामुळे गाडीमध्ये गुदमरून त्या दोघांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती समजताच औद्योगिक वसाहत पोलिसांनी आणि साळुंके रेस्क्यू टीमचे प्रशांत साळुंके यांनी घटनास्थळी धाव घेत या दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी महाडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये नेले. याप्रकरणी औद्योगिक पोलीस ठाण्यात या दोन मुलांच्या आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here