खा. डाँ अमोल कोल्हे यांचे संसदेतील भाषण हे अत्यंत अभ्यासपूर्ण !
कोरोना काळात महाराष्ट्राला सर्वोतोपरी मदत करण्याऐवजी ,केंद्र सरकार कोंडी करतेय,जशी मदत हवी ती मिळत नाही ,असे मात त्यांनी मांडले आहे!
राज्यात विरोधीपक्ष सतत विरोधी भूमिकेतून आक्रमक आहे.
हे चित्र खरोखरीच विदारक आहे!
कोरोना आपत्कालिन स्थिती प्रथमतः जगाने अनुभवली.त्याचा मुकाबला करायचाय पण तो कुठून आक्रमण करेल हे कळत नाही!
अशावेळी मानवता महत्त्वाची ! आपली भूमिका लोकांसाठी काम करण्याची असायला हवी!
इथे सुशांत,कंगणा…अशा प्रकरणावरुन वादंग माजवला जातोय! काही सुपारी मिडिया थैमान घालत आहेत, हे तर निंदनीय!
जर कोरोना संकट कम्युनिटीस्प्रेड टप्प्यावर आले असेल तर हे जास्त घातक आहे!
महाराष्ट्र वीरांची संतांची,समाजसुधारकाची भूमी आहे,म्हणूनच आपलेपणाने चांगुलपणाने सर्वाना सामावून घेण्याचे काम आजवर महाराष्ट्राने केले. मात्र भले तर देऊ कासेची लंगोटी।नाठाळाचे माथी मारू हाणू काठी।।..हे संत तुकारामांचे
वचन महाराष्ट्र जास्त मानतो व जाणतो.प्रसंगी तशी कृतीही करतोच!
कर सर्वात जास्त महाराष्ट्र देतो!
इतर राज्यांनी आपला विकास करावा,रोजगार निर्माण करावेत म्हणजे तिथले लोक बाहेर जाणार नाहीत.
समाजमाध्यमांवर रोज नवी चिखलफेक महाराष्ट्रावर होतेय,हे कशासाठी?इथे मोठं व्हायच आणि वेळ आली की गद्दारी करायची!मग आपली जन्मभूमी महत्वाची मानून महाराष्ट्राबाबत गरळ ओकायची! ही कसली माणुसकी?
महाराष्ट्रात जी प्रगती झालीय त्याचा अभ्यास खुल्या मनाने केला तर त्यातील मर्म कळेल!
मात्र महाराष्ट्राला बोचकारण्याचे आणि हल्ले चढवून बदनाम करण्याचे जा काम होत आहे ते कुणाही संवेदनशील माणसाला सहन होणारे नाही.
पण आपल्या महाराष्ट्रातील जनतेच्या मतावर निवडून येणारे आपल्याच महाराष्ट्रावर चिखलफेक करत आहेत!
वाद ,विरोध होणे प्रश्न विचारणे,सुधारणा होणेसाठी आवाज उठवणे योग्यच पण कोरोना संकटकाळात आपल्याला मिळालेल्या मताच्या दानाचे ऋण लक्षात ठेवून त्यासाठी तरी काम करावं की नाही?
जनसेवक जर असे महाराष्ट्राच्या ताला जागणार नाहीत तर काय उपयोग यांचा?
हजारोंच्यानोकऱ्या गेल्यात,जगण्याचे अनेक प्रश्न आहेत,आपल्या कार्यक्षेत्रातील जनतेसाठी काम करणं हे यांचं आद्य कर्तव्य!
कितीजण आपल्या विभागात काम करताहेत?
महाराष्ट्र सरकारकडून कार्य पूर्ती होत नसेल तर आपलं वजन केंद्राकडे लावून का महाराष्ट्रात मदत आणि सहायता निधी आणत नाहीत?
सत्ताधारी व विरोधक अशा वेळी मिळून का काम करत नाहीत?
असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत!
सरकार पाडापाडी,इतर राजकारण नंतर करावे न!
पण घेतल्या मताला जागाल की नाही?
या स्थितीत निवडून आलेल्या प्रत्येकाने इतरत्र फिरण्यापेक्षा आपल्या विभागात लक्ष केंद्रित करुन काम करायला हवं!
तिथून समन्वय करायला हवा!
जनतेला लाँक-अनलाँकचेही सर्व नियम पाळावे लागतात मग यांनाही नियम असायला हवेत,अशी जनभावना!
पण कुणी कुणाला विचारत नाही ,जुमानत नाहीत असं हे हायफाय अराजक आहे!ते थांबणं अत्यावश्यक आहे!
कधी होईल हे?
शीतल करदेकर
Home प्रगती विशेष संवेदनशीलपणा,माणुसकी,सहकार्य भावनेतून काम होण्याची गरज आहे.जनक्षोभ होईपर्यंत अंत पाहू नये! -शीतल करदेकर