गुहागर ; होय ते चार प्रवाशी माझ्याच बस मधून गुहागर गेले…..

0
1081
बातम्या शेअर करा

गुहागर -(विशेष प्रतिनिधी ) – त्या दिवशी संध्याकाळी सात वाजले होते. आम्ही चिपळूण ते गुहागर बस घेऊन येत होतो. शुंगारतळी येते माझी बस थांबली आणि त्याच वेळेला हे चौघेही माझ्या बसमध्ये चढले त्यामध्ये एक महिला आणि तीन पुरुष होते मी त्यांना गुहागरचे तिकीट दिलं. आणि माझ्या गाडीतून गुहागरला आणले.

दोन दिवसापूर्वी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण यांनी शृंगारतळी ते गुहागर एसटी बस मधून प्रवास केल्याची धक्कादायक घटना उघड झाली होती. याबाबत प्रगती टाइम्स’ने पाठपुरावा केला असता अखेर आम्ही त्या बस वाहक का पर्यंत पोहोचलो वाहकाने आम्हाला जे सांगितलं ते धक्कादायक होतं. त्या दिवशी संध्याकाळी सातच्या दरम्यान गाडी शृंगारतळी येथे आली आणि त्या चार जणांनी शृंगारतळी तून गुहागर कडे जाण्यासाठी बस मध्ये प्रवेश केला नशीब बलवत्तर म्हणून बसमध्ये इतर कोणी प्रवासी नव्हते. त्या चौघांना धरून मी पाच आणि ड्रायव्हर 6 असे आम्ही सहा जण त्या बसमध्ये होतो. जवळपास सात वाजून 40 मिनिटाच्याच्या दरम्यान ही बस गुहागरला आली यानंतर माझे सहकारी चालक होते त्यांनी गाडी डेपोत जमा केली. मात्र ज्यावेळी मला दुसऱ्या दिवशी प्रगती टाईम्सचे वृत्त वाचल्यावर लक्षात आले ते चार कोरोना रुग्ण ज्या बसमधून गेले त्या बसवर मी वाहक होतो म्हणून तसाच हा सर्व प्रकार त्यावेळी मात्र मी आगार प्रमुखांना सांगितला.त्यानंतर आगार प्रमुख यांच्या सूचनेनुसार सध्या मी स्वतःला विलगीकरण करून घेतले आहे.

जर अशाप्रकारे पॉझिटिव्ह रुग्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून नावाजलेल्या एसटी बस मधून फिरत असतील तर अशा या पॉझिटिव रुग्णांवर कारवाई करावी अशी मागणी आता एसटी कर्मचारी करतात. कारण अशा या व्यक्तीमुळे लोकांचा एसटीवरचा भरवसा उडून जाईल व आधीच तोट्यात असलेली बस पुन्हा या कारणामुळे आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या पॉझिटिव रुग्णांवर कारवाई करावी अशी मागणी एस टी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
तसेच यापुढे ज्या ठिकाणी कोरोना तपासणी होईल त्या ठिकाणी आलेल्या पॉझिटिव रुग्णांना त्या ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या वाहनांची सुविधा उपलब्ध होईपर्यंत त्यांना त्या ठिकाणाहून सोडू नये. जेणेकरून अशाप्रकारे भविष्यात प्रसंग होणार नाही. याची काळजी सुद्धा घ्यावी अशी चर्चा सध्या सर्वसामान्यांच्या तून होत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here