चिपळूण – चिपळूण तालुक्यातील मिरजोळी येथील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल प्रशासनाने आमच्याबरोबर मनमानी कारभार करून आमच्या मुलांना वेठीस धरण्याचा प्रकार केल्याचा आरोप नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या पालक संघाने केला आहे. याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात ही संस्था आमच्याकडून लाखो रुपयांची फी घेत असून लॉकडाऊन मध्ये बंद असलेल्या शाळेची फी भरण्याची सक्ती करत असल्याचा आरोप या निवेदनात केला आहे.
या संस्थेने सध्या मुलांना ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. मात्र अनेक ठिकाणी रेंज नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. मात्र असं असलं तरी संस्था मात्र या ना त्या कारणाने फी भरण्यासाठी तगादा लावत असल्याचे पालकांनी सांगितले. नुकतीच काही पालकांनी येऊन शाळेतील संस्थेच्या शिक्षकांनशी व संचालक मंडळांची बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या संस्थेतील शिक्षकांनी दबंग’गिरी दाखवत आम्हाला तुमची गरज नाही. तुमची मुले आमच्या शाळेत शिकणार आहेत. तेव्हा आम्ही बघून घेऊ अशी धमकी दिली. आणि पालकांशी चर्चा न करता उलट सुलट उत्तर देत आम्ही तुमच्यासोबत चर्चेला बसणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा अशा भाषेत उत्तर दिले. त्यामुळे सदर शाळेच्या मनमानी कारभारामुळे वैतागलेल्या पालकांनी अखेर पालकमंत्री अनिल परब ,आमदार भास्करराव जाधव ,आमदार शेखर निकम ,जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने ,जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर ,शिक्षण सभापती सुनील मोरे ,मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन या संस्थेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2020/09/IMG-20200912-WA0036-768x1024.jpg)