साखरपा – साखरपा परिसरात काल कोरोनाचे ७ रुग्ण सापडले ह्या पार्श्वभूमीवर आज कोंडगाव साखरपा व्यापारी मंडळाची तातडीची सभा ग्रामपंचायत कोंडगावच्या सभागृहात संपन्न झाली त्या सभेत आज सोमवार दि २४ ऑगस्ट ते बुधवार दि २६ ऑगस्ट २०२० ह्या कालावधीत संपूर्ण बाजारपेठ दुपारी २ वाजेपर्यंतच उघडी राहील व गुरुवार दि २७ ऑगस्ट २०२० ते सोमवार दि. ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत संपूर्ण बाजारपेठ पूर्णपणे कडक बंद राहील व सोमवारी परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल असा ठराव सर्वानुमते संमत झाला.
