खेड – खेड तालुका काँग्रेसआयच्यावतीने आमदार हुसनाबानू खलीफे यांच्या माध्यमातून खेड आगाराला पल्स ऑक्सिमीटर भेट देण्यात आले,
यापूर्वी ही काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब यांच्या माध्यमातून महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष उमेश खेडेकर यांनी कोरोनामध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या चालक वाहक यांना मास्क आणि आर्सेनिक अलबम च्या गोळ्या भेट दिल्या होत्या.
सद्या खेड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या चालक -वाहक यांचे शरीरातील ऑक्सिजन तपासून त्यांना तात्काळ उपचार घेता येईल यासाठी पल्स मीटर देत असल्याचे गौस खतीब यांनी सांगितले.
यावेळी खेड आगाराचे आगारव्यवस्थापक श्री. प्रशांत करवंदे, श्री. गौसभाई खतीब, श्री. अनिल सदरे, श्री. नवनाथ कदम, महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री उमेश खेडेकर उपस्थित होते
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2020/08/20200823_193853-1024x1024.jpg)