संगमेश्वर -संगमेश्वर तालुक्यातील आंबवली पाष्टेवाडी येथे भक्षाचा पाठलाग करतांना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना रविवारी रात्री घडली .
बिबट्या विहिरीत पडल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी वन विभागा जवळ संपर्क साधला . वन विभागाचे अधिकारी आंबवली पाष्टेवाडीमध्ये दाखल झाले . एक तासाच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला पिंजऱ्यात बंद करण्यात वन विभागाला यश आले . विभागीय वनाधिकारी रमाकांत भवर यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने ही मोहीम फत्ते केली . या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले . या मोहिमेत ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले . पाच वर्षे वाढीचा हा नर जातीचा बिबट्या होता . यावेळी परिक्षेत्र वनाधिकारी प्रियांका लगड , वनपाल सुरेश उपरे , वनरक्षक नानू गावडे , मिलींद डाफळे , शर्वरी कदम आदि यावेळी उपस्थित होते .
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2020/08/20200823_193853-1024x1024.jpg)