बातम्या शेअर करा

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात पोलिसांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे याच्या संकल्पनेतून पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांसाठी 50 बेडच कोविड सेंटर पोलीस मुख्यालयाच्या जवळ असणाऱ्या इमारती मध्ये कोविड सेंटर आज पासून सुरु होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आजपर्यंत 54 पोलीस कर्मचारी ,अधिकारी त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोविड बाधित झाले असून एकट्या रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील 11 कर्मचारी बाधित झाले आहेत. कायदा व सुरक्षिततेचे काम करता करत असताना ही लोक नागरिकांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे पोलिस कर्मचारी ही बाधित होत असून त्याचा ताण पोलिस यंत्रणेवर पडत आहे आहे.
आपले कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे पुढे सरसावले असून त्यांनी पोलीस मुख्यालयातील इमारतीमध्ये पोलीस व त्यांच्या कुटुंबासाठी 50 बेडच कोविड सेंटर उभ केल आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे हे स्वतः डॉक्टर असून त्यांनी कोविडचा अनुभव स्वतः घेतला असल्याने अशा वेळी काय करावं व काय करू नये यांची पूर्ण कल्पना त्यांना असल्याने अनुभवाचा फायदा या लोकांना होणार आहे. कारण कोरोनाला हरवून ते कोरोना योद्धा म्हणून जिंकून आले आहेत.त्यामुळे कोरोनावर कशी मात करायची यासाठी आपले कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी हे सेंटर येथे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या कोविड सेंटरमध्ये अजिबात कोविडची लक्षणे नाहीत पण ते पॉजिटीव्ह आले आहेत. तसेच शासकीय रुग्णालयात अधिकृत उपचार करून ज्यांना निरक्षणासाठी समाजकल्याण भवनमध्ये ठेवलं जात तिथे ते पूर्ण बरे होण्यासाठी 14 दिवस लागतात. अशा ना इथे आणलं जाणार आहे. शासकीय रुग्णालयाच्या मार्गदर्शनाखाली इथे उपचार केले जाणार आहेत. दिवसातून दोन वेळा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर इथे भेट देऊन येथील रुग्णनांना तपासणार आहेत. तसेच अगदीच गरज असेल तर येथील रुग्णाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येईल या कोविड सेंटरची देखभाल एक पोलीस अधिकारी करणार असून इथे असलेल्या रुग्णांना कोणती अडचण वा काही समस्या असल्यास त्यावर लक्ष ठेवून समन्व्यक यांची भूमिका हे अधिकारी करणार आहेत.पोलीस कर्मचारी व त्याच्या व त्यांच्या कुटुंबांना इथे ठेवले जाणार असून अगदी घरच्या प्रमाणे त्यांची देखभाल व काळजी घेतली जाणार आहे. आणि त्यांना पुन्हा कामावर हजर होण्यासाठी सुदृढ बनवलं जाणार आहे.काही वेळा पोलीस खात्यात काम करत असल्यामुळे पती पत्नी दोघे ही बाधित निघतात अशा वेळी त्यांची काळजी घेणे आवश्यक असते. पण त्याच बरोबर त्याच्या कुटुंबातील सदस्य ही एखाद्या वेळी बाधित झाला तर त्यांची काळजी घेणे ही तितकीच आवश्यक असते. आपल्या कुटुंबातील लोकांची काळजी व धीर देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे पुढे सरसावले आहेत त्यांनी महाराष्ट्रातील एक पहिलाच आगळावेगळा उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यात राबविला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी मानसिकदृष्ट्या दिलासा मिळणार असून त्याचे मनोधैर्य नक्कीच वाढवून पुन्हा ते जोमाने कामाला लागणार आहेत.
50 बेडच्या याकोविड सेंटर आज पासून कार्यान्वित होणार आहे. समाज कल्याण भवनातील 8 पोलीस कर्मचारी आज इथे शिप्ट केले जाणार आहेत. ज्यांना निरीक्षणाखाली काही दिवसासाठी ठेवलं जात अशा लोकांना इथे ठेवलं जाणार आहे. स्वतः कोविड योद्धा असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी एक सामाजिक बांधिलकी राखत चांगली सुविधा उपलब्ध करून देत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here