मुंबई – देशात आज कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण कायम आहे. गेल्या २४ तासांत सुमारे ६७ हजार रुग्ण आढळून आले आहे. तर ९४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत तब्बल ६६ हजार ९९९ रुग्ण आढळून आले. यामुळे देशातील रुग्णसंख्या २३ लाख ९६ हजार ६३८ वर पोहोचली आहे. यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ५३ हजार ६२२ एवढी आहे. आतापर्यंत ४७ हजार ३३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. काल बुधवारी ६० हजारांहून अधिक नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली होती, तर ८३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ५६ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली होती.