510

गुहागर – ( यश घोणसेपाटील ) – राज्याच्या विविध भागांत दुष्काळाचे संकट गडद होत असताना, त्याचे संभाव्य परिणाम कोकणातील शेतकरी आणि पशुपालकांनाही जाणवू शकतात. या संकटाचा सामना करण्यासाठी आतापासूनच जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता वाढविणे गरजेचे आहे. याच उद्देशाने गुहागर तालुक्यातील झोंबडी फाटा येथे उद्या माळरानावरील गवत कापणी आणि भारा बांधणी यंत्राचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे.

गुहागर आणि चिपळूण तालुक्यांतील माळरानांवर मोठ्या प्रमाणात नैसर्गिक गवत उगवते. मात्र, वेळेत या गवताची कापणी करून त्याची साठवण न केल्यास ते सुकून जाते. त्यानंतर माळरानावर वणवा लागल्यास हे गवत जळून नष्ट होते. त्यामुळे जनावरांसाठी उपलब्ध होऊ शकणारा चारा वाया जाण्याबरोबरच शेतकऱ्यांचेही नुकसान होते. ही परिस्थिती टाळण्यासाठी माळरानावरील गवत योग्य वेळी कापून त्याचे भारे बांधून सुरक्षितपणे साठवून ठेवणे हा एक उपयुक्त पर्याय ठरू शकतो. गवत कापणी व भारा बांधणी यंत्राच्या साहाय्याने हे काम कमी वेळेत करता येऊ शकते. त्यामुळे भविष्यात चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्यास पशुपालकांना त्याचा फायदा होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर उद्या 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते 9 च्या दरम्याने झोंबडी फाटा येथे गवत कापणी व भारा बांधणी यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. या प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना यंत्राच्या कार्यपद्धतीची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे. या यंत्राच्या अधिक माहितीसाठी अधिक मिलिंद गाडगीळ – 8806661079 यांना संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here