संगमेश्वर- मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील ओझरखोल येथे रत्नागिरी-चिपळूण एसटी बस आणि चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या खासगी मिनी बसची समोरासमोर भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर मिनीबस चालक केबीनमध्येच अडकला होता.
या अपघातात मिनी बसचा चालक वाहनाच्या कॅबिनमध्ये अडकला होता. अग्निशमन दलाच्या मदतीने अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यालाही रत्नागिरीत हलवण्यात आले आहे.
या अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस आणि वाहतूक विभागाने तत्काळ रस्त्यावर नियंत्रण मिळवून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत.