गुहागर ; रक्तदान करून आगळावेगळा वाढदिवस साजरा करणारा हा नवतरुण

0
124
बातम्या शेअर करा

गुहागर- गुहागर तालुक्यातील पालपेणे येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश खैर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

उमेश याने स्वतः खूप कमी वयात आतापर्यंत 25 वेळा रक्तदान केलं आहे. आजपर्यंत त्याने अनेक वेळा रक्तदान केल आहे मात्र आपला वाढदिवस एक वेगळ्या प्रकारे साजरा केला जावा यासाठी दरवर्षी तो रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतो. वाढदिवसाच्या निमित्त हे 8 वे शिबीर आहे.गुहागर तालुक्यातील मित्र परिवार हे आयोजित करत असतात तसेच, याच दिवशी जीवन ज्योती विशेष शाळा याठिकाणी छोटीशी भेटवस्तू देऊन, त्या विशेष मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला जातो.

प्रत्येक सर्वसामान्य, गरजू व्यक्तींना मोफत आणि वेळेत रक्त मिळावे यासाठी तो नेहमीच प्रयत्नशील राहतो. खूप कमी वयात उमेशने सामाजिक कार्यात बहुमोल योगदान दिल्याबद्दल गेल्या काही वर्षात उमेशला सामाजिक क्षेत्रातील मानाचे सहा पुरस्कार मिळाले आहेत. यात त्याला समाजभूषण हा पुरस्कार सुध्दा बहाल करण्यात आला होता, नुकताच त्यांना कोकणरत्न हा अजून एक पुरस्कार जाहीर झाला आहे. यावरून उमेशच्या कामाची प्रचिती येते.
आपला वाढदिवस समाजाच्या सार्थकी लागावा म्हणून जिल्हा शासकीय रक्तपेढी, रत्नागिरी यांच्या शिबिरात शनिवार दिनांक 26 जुलै 2025 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत भवानी सभागृह, पालपेणे रोड येथे रक्तदान करून उमेशच्या सामाजिक आणि लोकोपयोगी कार्याला हातभार लावण्याचे आवाहन त्याच्या मित्र परिवार यांनी केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here