चिपळूण – गेल्या काही दिवसांत चिपळूणमध्ये वणवा लागण्याच्या सातत्याने घटना घडत आहेत. या घटना ताज्या असतानाच आज दुपारी चिपळूण-गुहागर बायपास मार्गावरील भानुशाली यांच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत गोदामातील बारदान जळून खाक झाले आहे.
चिपळूण – गुहागर बायपास मार्गावरील भानुशाली यांच्या बारदानाच्या गोदामाला आज दुपारी अचानक आग लागली. ही आग इतकी तीव्र होती की आगीच्या धुराचे लोळ बाहेर पडताना दिसत होते. ही घटना समजतात चिपळूणवासीयांनी घटनास्थळी धाव घेतली. तर चिपळूण नगरपरिषद व लोटे औद्योगिक वसाहती मधील अग्निशमन दलाने देखील धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र, भर दुपारी आग लागल्याने ही आग सातत्याने भडकत होती. मात्र तोपर्यंत आधी मध्ये गोडाऊन मधील बारदान जळून खाक झाले. एकंदरीत भानुशाली यांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. सध्याही आग कशाने लागली याचा तपास स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस करत आहेत.