गुहागर – गुहागर तालुक्यातील एका ग्रामीण भागातील पोस्टमास्तर आपल्या ऑफिसच्या व्हाट्सअप ग्रुप वर मी आत्महत्या करतोय असा मेसेज दिल्याने सध्या या परिसरात एकच खळबळ माजली आहे.

गुहागर तालुका अतिशय दुर्गम भागात विभागलेला भाग म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील खाडीकिनारील अनेक गावांमध्ये पोस्टमास्तर आणि पोस्टमन अशी दोन कर्मचारी हे गावामध्ये सेवा देत असतात मात्र गेल्या आठ दिवसापासून गुहागर तालुक्यातील पेवे गावातील पोस्टमन हा शृंगारतळी येतील वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या मर्जीतील असल्याने त्याला दुसऱ्या ठिकाणी कामगिरीवर काढले मात्र त्याचा फटका बसला तो याच पेवे गावातील 54 वर्षीय पोस्टमास्तरला बसला.सध्या हा 54 वर्षीय पोस्टमास्तर हा गेल्या आठ दिवसापासून आपल्या गावातील पोस्टमास्टर आणि पोस्टमन या दोन्ही पदाची काम करतोय परिणामी कामाचा ताण येऊन त्याची मानसिक स्थिती ढासळलेली आहे. अशातच त्यांचे शृंगारतळी येथील वरिष्ठ अधिकारी प्रभारी डाकनिरीक्षक हे त्यांना काही महिन्यापासून या पोस्टमास्तरला त्रास देत असल्याचे समजते. डाकनिरीक्षक यांना पेवे गावचे पोस्टमास्तर यांनी आठ दिवसात अनेक वेळा फोन करून मला या दोन्ही कामाचा लोड जास्त होतोय आणि मला ते करताना खूप मानसिक त्रास होतो. याबाबत सविस्तर सांगितले मात्र तरीही डाक निरीक्षक याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करता आहेत हे त्यांच्या लक्षात आले. तसेच आपल्या मर्जीतील पोस्टमनला त्यांनी कामगिरीवर काढल्याने त्यांच्यावर कामाचा जास्त लोड ही आला अखेर या पेवे गावातील 54 वर्षे पोस्ट मास्तरने ऑफिसच्या सोशल मीडिया ग्रुप वर आपण आत्महत्या करतोय. माझ्याकडे शेवटची पाच मिनिट शिल्लक आहेत. असा मेसेज टाईप केला. तसेच या मेसेजच्या आधी डाक निरीक्षक प्रमोद पाटील यांना त्यांनी एक फोन कॉलही केला आहे. त्यामध्ये ते सर तुम्ही माझा ऐकून घ्या अन्यथा माझे शेवटचे पाच मिनिट शिल्लक आहेत. मी आत्महत्या करतोय असे फोन करूनही सांगितले मात्र त्याच वेळी निष्टुर अशा प्रमोद पाटील यांनी तुम्हाला जे काय करायचे ते करा पुन्हा मला फोन करू नका असे सांगून त्यांचा फोन कट केला. त्यामुळे आता नक्की पेवे गावचे पोस्टमास्टर यांचं काय होईल..? त्यांची अशी पोस्ट सोशल मीडियावर आल्याने त्यांचे सहकारीही सध्या चिंतेत आहेत. त्यामुळे आता जर पेवे गावच्या पोस्टमास्तर ने आत्महत्या केली तर याला जबाबदार कोण..? असा प्रश्न त्या निमित्ताने उभा होत आहे. तसेच मनमानी करणारे आणि पाटील की मिरवणारे प्रमोद पाटील यांच्यावर कोण कारवाई करणार असा प्रश्न त्या निमित्ताने उभा राहिला आहे.
आमच्या गावचे पोस्टमास्टर हे गेली अनेक वर्ष नित्यनेमाने तन-मन धन अर्पण करीत आपली सेवा बजावत आहेत. अशा या निस्वार्थी पोस्टमास्तरला जर कोण नाहक त्रास देणार असेल आणि त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही सर्व गाववाले शृंगारतळी येथे डाकनिरीक्षकाला जाब विचारू असे पेवे गावचे माजी सरपंच निसारखान सरगुरो यांनी सांगितले.