चिपळूण – चिपळूणनजिक कळंबस्ते फाटा येथे फाटक न पडल्याने गोव्याहून मुंबईकडे जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस फुलावरच थांबवावी लागली. अखेर पायलटिंग करत फटकापर्यंत नेऊन मॅन्युअली पद्धतीने फाटक उघडल्यावर वन्य भारत एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झाली.
चिपळूण स्टेशनच्या आधी कळंबस्ते येथे रेल्वे फाटकाजवळ पंधरा दिवसात पुन्हा एकदा फाटक न पडल्याने वंदे भारत एक्सप्रेसला ब्रेक लावावे लागले आणि ही एक्सप्रेस गाडी खेर्डी पुलावर थांबली. गेल्या पंधरा दिवसांतील ही दुसरी घटना असून कोकण रेल्वेच्या कारभाराविरोधात परिसरातील नागरिक व वाहनचालक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. सुदैवाने दुसर्या वेळीही मोठा अनर्थ टळला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण रेल्वे स्टेशनच्या नजिक कळंबस्ते येथे रेल्वे फाटक आहे. या ठिकाणी ओव्हरब्रिज बांधावा आणि पंधरागावाकडे जाणार्या लोकांना या उड्डाण पुलावरून वाहतूक करण्यास मार्ग करावा अशी मागणी अनेक वर्षे करण्यात येत आहे. त्यासाठी कोकण रेल्वेने तरतूद केली आहे. राज्य शासनानेही तरतूद करणे गरजेचे आहे. मात्र, अद्याप या ठिकाणी फाटक असून पंधरागावकडे जाणार्या-येणार्या लोकांना ट्रेन आली की दहा ते वीस मिनिट फाटक पडल्याने मार्ग बंद होतो व लोकांची गैरसोय होते. गेल्या आठ दिवसांपूर्वी याच ठिकाणी अचानक फाटक न पडल्याने तारांबळ उडाली. सुदैवाने अनर्थ टळला.
मंगळवार दि . 4 रोजी सायंकाळी देखील 6:30 वाजण्याच्या सुमारास याच कळंबस्ते फाटकानजिक तोच प्रकार पुन्हा घडला. वंदे भारत एक्स्प्रेस रत्नागिरीहून मुंबईकडे जात असता खेर्डी पुलानजिक आली असता अचानक या एक्स्प्रेसला ब्रेक लावण्यात आले आणि वंदे भारत ट्रेन पुलावरच थांबविण्यात आली. त्यानंतर अत्यंत हळूहळू कळंबस्ते रेल्वे फाटकापर्यंत नेण्यात आली व त्या ठिकाणी पुन्हा हॉर्न वाजवून ती सोडण्यात आली.