खेड – खेड तालुक्यातील मुंबई -गोवा महामार्गावरील कळंबणी रुग्णालय मार्फत नुकतेच किंजळे येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले या शिबिरात 685 जणांनी लाभ घेतला.
कळंबनी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बालाजी सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय योजना ,आभा कार्ड,आयुष्यमान कार्ड कर्करोग व्यसन यावर मार्गदर्शन करण्यात आले तर डॉक्टर वैदही शेळके यांनी महिलांना आरोग्य विषयक सविस्तर माहिती या शिबिरात दिली. तसेच या शिबिरासाठी डॉक्टर गवळी ,डॉक्टर केंद्रे ,डॉक्टर विलास मस्के ,डॉक्टर घाडगे ,महाडिक, दिग्विजय यादव, रश्मी चव्हाण व आरोग्यातील इतर कर्मचारी उपस्थित होते. तर या शिबिरासाठी कुंभारजाई सामाजिक विकास संस्थेमार्फत औषधाचा पुरवठा केला गेला होता. या शिबिराचा गावातील अनेकांना फायदा झाला असून अशा प्रकारचे अनेक शिबिर अनेक गावात घेणार असल्याचे आरोग्य विभाग मार्फत सांगण्यात आले.