गुहागर – गुहागर तालुक्यातील झोंबडी येथील विनोद अनंत सकपाळ हे आज भारतीय सैन्यात 28 वर्ष सेवा करून निवृत्त झाल्याने आज आपल्या मूळ गावी परतत आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागताचे सध्या गुहागरसह झोंबडी गावात मोठ्या उत्साहात स्वागताची तयारी सुरू आहे.
विनोद अनंत सकपाळ हे झोंबडी गावचे रहिवासी लहानपणापासूनच त्यांना सैन्यात भरती होण्याची ओढ होती. त्यांचाच कुटुंबात त्यांचे वडील भारतीय सैन्यातच देशाची सेवा करत होते. तेच पाहून त्यांना सुद्धा भरती होण्याची ओढ लागली होती. अखेर 31 डिसेंबर 1996 रोजी ते भारतीय सैन्यात थलसेना या ठिकाणी रुजू झाले. गेल्या 28 वर्षात त्यांनी जम्मू काश्मीर, पंजाब ,आसाम या ठिकाणी देशाची सेवा केली आहे. नुकतेच ते 28 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले झाले आहेत. निवृत्तीनंतर प्रथमच ते आपल्या गुहागर तालुक्यातील झोंबडी या मूळ गावी येत असल्याने गावामध्ये सध्या त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. 20 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता आपल्या मायभूमीत येत असल्याने सध्या झोंबडी गावात एक वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे. झोंबडी या त्यांच्या मूळ गावी त्यांचे दोन लहान भाऊ ,आई-वडील ,वहिनी पुतणे असा मोठा परिवार आहे.