गुहागर ; बांगलादेश येथे हिंदू वरील होत असलेल्या अत्याचाराविरोधात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मूक मोर्चा

0
136
बातम्या शेअर करा

गुहागर – बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा आणि इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तता व्हावी यासाठी आज गुहागर येथे विश्व हिंदू परिषद गुहागरच्या वतीने मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .हा मूक मोर्चा गुहागर शिवाजी चौक येथून तहसीलदार कार्यालय गुहागर येथे संपन्न झाला

बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. तेथील हिंदू महिलांवर देखील तो अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी व तेथील मुंडा, चकमा, कुकी, बौद्ध इत्यादी आदिवासी व दलीत हिंदू बांधवांना ईस्लामी कट्टरतावाद्यांनी अवैध मार्गाने जीवन जगणे अत्यंत कष्टप्रद करून टाकले आहे बांगलादेशचे सरकार देखील हिंदूंसोबतच अन्य अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचास मूकसंमतीच देताना दिसून येत आहे.
या सर्व अत्याचाराची भारतातील हिंदू समाजास चिंता वाटत आहे. आम्ही अत्यंत कठोर शब्दात याचा निषेध व्यक्त करतो.
या सर्व अत्याचाराचा निषेध शांततेने आणि लोकशाही मार्गाने व्यक्त करणाऱ्या इस्कॉनच्या साधूंना देखील बांगलादेशच्या सरकारने देशद्रोह्याची कठीण कलमे लावून तुरुंगात डांबले आहे.

स्वातंत्र्याच्या वेळी बांगलादेश मधील हिंदूंची संख्या ३८ टक्के होती ती घटून आज केवळ आठ टक्केच राहिली आहे. आपल्या सरकारने जर वेळीच पावले उचलली नाही तर बांगलादेशातील ८% हिंदू व अन्य अल्पसंख्यांक समाज जिहादी इस्लामी कट्टरता बादाला बळी पडून संपूर्णपणे नामशेष होईल, असे भविष्य स्पष्टपणे दिसून येत आहे.
त्यामुळे आम्ही सकल हिंदू समाज भारत सरकारास आवाहन करतो की, बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी आवश्यक ते सर्व उपाय तात्काळ अमलात आणावेत आणि अटकेत असलेल्या बांग्लादेशातील साधूंची त्वरित मुक्तता व्हावी यासाठी बांगलादेशी सरकारला निर्देश द्यावे. अशी विनंती करण्याकरिता गुहागर शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील आम्ही नागरिक आज रोजी आपल्या कार्यालया समोर उपस्थित झालो आहोत. यावेळी तहसीलदारांना निवेदन सुद्धा देण्यात आले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here