चिपळूण – अण्णा जाधव यांनी जाहीर केलेल्या 12 डिसेंबर 2024 रोजीच्या मोर्चा मध्ये, सहभागी होऊ नये असे आवाहन सामाजिक संघटनांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात जाहीर केले आहे.
अण्णा जाधव याच्या वरील हल्ल्यातील हल्लेखोर आरोपी पोलिस यंत्रणेने ताब्यात घेतले आहेत, त्यामुळे पोलिसांचा तपास प्रगती पथावर आहे, थोड्याच दिवसात तपास पूर्ण होऊन खरे सत्य समोर येईल. असे असताना अण्णा जाधव आंदोलन करण्यावर ठाम आहे, जिल्हा प्रशासनाने 20 डिसेंबर 2024 पर्यंत जमाव बंदी आदेश जारी केला आहे अशा स्थितीत अण्णा जाधव लोकांना मोर्च्यात सहभागी होण्याकरिता भावनिक करीत आहेत त्यांच्या आवाहनाला बळी पडून मोर्च्यात सहभागी होणाऱ्या आंदोलकांवर कायदेशीर कार्यवाही होऊन अडचणी निर्माण होतील या साठी चिपळूण तालुक्यातील बौद्ध बांधवांनी मोर्चात सहभागी होणे टाळावे.
चिपळूण तालुक्यातील शांतीचा सलोखा आणि जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून सामाजिक संघटनांनी बौद्ध समाज बांधवांना आवाहन केले परंतु अण्णा जाधव यांनी नाहक चिखल फेक करून टक्के वारी घेणारे व दलाली करणारे असा खोटा व खोडसाळ आरोप अण्णा जाधवांनी तालुक्यातील सामाजिक संस्था व राजकीय कार्यकर्ते यांच्या वर केले आहेत. परंतु खरा दलाल कोण याचे उत्तर येणारा काळ देईल, अण्णा जाधव याने केलेल्या आरोपाचे खंडण करण्यासाठी लवकरच तालुका स्तरावर भव्य मेळावा घेऊन अण्णा जाधव यांचे खरे रूप लोकांसमोर मांडले जाईल.
तरी तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन हितसंरक्षण समिती , बौद्धाजन पंचायत समिती आणि मातंग समाज संघटना यांनी तालुक्यातील जनतेचे सदरील मोर्च्यात सहभागी होवू नये अन्यथा पुढील कायदेशीर कार्यवाही मध्ये समाजाचे सहकार्य मिळणार नाही.
सदरील बैठकीला चंद्रकांत सावंत, जयरत्न कदम, महेश सावंत,विनोद कदम, संदेश मोहिते, सुशांत जाधव, सुभाष मोहिते, जगदीश कांबळे, श्रीधर भाऊ सकपाळ, विलास जाधव, नाना सावंत, काशिराम कदम, प्रशांत मोहिते, रमण मोहिते, चंद्रकांत जाधव, सुधाकर पवार, सुदेश गमरे, सचिन मोहिते, सुनील सावंत, सुरेश भिसे, संजय गमरे आदी मान्यवर उपस्थित होते.