गुहागर – राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे वातावरण आता जोरदार तापू लागले त्यातच गुहागर विधानसभा मतदारसंघात सुद्धा महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये आता जोरदार टक्कर होईल असं वातावरण सध्या निर्माण झालं आणि हे वातावरण ज्यांनी निर्माण केले ते आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य शिलेदार रवींद्र फाटक
…..होय हेच रवींद्र फाटक गुहागर विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा दिवसापासून तळ ठोकुन आहेत. ज्या मतदार संघात एकेकाळी भास्कर जाधव एकतर्फी निवडणूक जिंकतात की काय असं वातावरण असतानाच रवींद्र फाटक यांच्या दहा दिवसाच्या या प्रचाराच्या रणनीतीने आता मात्र या मतदारसंघातील वातावरण संपूर्ण बदलून गेल आहे.आता या मतदारसंघात भास्कर जाधव विरुद्ध राजेश बेंडल ही काटे की टक्कर होईल.. त्यामुळे या मतदारसंघात रवींद्र फाटक किंगमेकरची भूमिका निभावणार का याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
गुहागर विधानसभा मतदारसंघात ज्यावेळेला निवडणूक जाहीर झाल्या त्यावेळेला भास्कर जाधव यांच्यासमोर उमेदवार कोण.? असा प्रश्न निर्माण झाला होता त्याचवेळी भास्कर जाधव हे एकतर्फी निवडणूक जिंकून येथील असं वातावरण होतं मात्र त्यानंतर राजेश बेंडल यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उमेदवारी देऊन या ठिकाणी कुणबी समाजाचा उमेदवार दिला मात्र असं असलं तरी या निवडणुकीत भास्कर जाधव हेच निवडून येतील असं वातावरण त्यावेळी होतं. त्यानंतर मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे असे रवींद्र फाटक यांच्यावर सर्व जबाबदारी गुहागर विधानसभा मतदारसंघाचे देण्यात आली त्याचवेळी मंत्री उदय सामंत आणि रवींद्र फाटक यांच्या राजकीय खेळीने गुहागर मतदार संघातील संपूर्ण वातावरण सध्या पूर्ण बदलून गेले आणि आता या मतदारसंघातील भास्कर जाधव विरुद्ध राजेश बेंडल ही निवडणूक काटे की टक्कर होणार हे मात्र नक्की झाले….. कारण नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी सभा झाली त्या सभेमध्ये झालेली गर्दी पाहून विरोधकांनाही धडकी भरली आहे. तर त्याचवेळी गुहागर विधानसभा मतदारसंघातील मोठ्या संख्येने मतदार असलेला कुणबी समाज हा आता एक होऊन राजेश बेंडल यांच्या पाठीमागे उभा राहिला आहे हे चित्र स्पष्ट झालं…. त्यामुळे या मतदारसंघात आता नक्की कोण बाजी मारणार..? याची चर्चा नाक्या नाक्यावर रंगू लागली आहे. तर ही चर्चा रंगण्यासाठी ज्यांनी दहा दिवसापासून गुहागर विधानसभा मतदारसंघात तळ ठोकून आहेत. असे रवींद्र फाटक या विधानसभा मतदारसंघात नक्की करिष्मा घडवणार काय याची चर्चा सुद्धा आता रंगू लागली आहे.