गुहागर – गुहागर विधानसभा मतदारसंघात या वेळेला चुरशीची अशी लढत पाहायला मिळाली. आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राजेश बेंडल हे उमेदवार उभे असल्याने या ठिकाणी चुरस निर्माण झाली. त्यातच या विधानसभा मतदारसंघात महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने लाडकी बहीण योजना नक्की कोणाला पावणार..? आणि कोणाचा झेंडा या मतदारसंघावर फडकवणार ..? हे या लाडक्या बहिणीच ठरवणार असल्याच झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
गुहागर विधानसभा मतदार संघात एकूण 1,49,957 मतदान झाले असून यामध्ये सगळ्यात जास्त मतदान हे महिलांनी केले केले आहे.79,374 एवढ्या महिलांनी मतदान केल्याने महिलाच या मतदारसंघातील विजय उमेदवार ठरवणार आहेत. या मतदारसंघात महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने लाडकी बहीण योजना ही महायुतीला तारणार का..? याची चर्चा सध्या संपूर्ण गुहागर विधानसभा मतदारसंघात सुरू आहे.
गुहागर विधानसभा मतदारसंघात 61.79% एवढे मतदान झाले असून सगळीकडे शांततेत मतदान झाले आहे. गुहागर तालुक्यातील तीन ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाला होता. मात्र तात्काळ त्या ठिकाणी मशीन बदलून मतदान सुरळीत पार पाडले. मतदानासाठी अनेक ठिकाणी मुंबईतून येणारे मतदार हे उशिरा आल्याने काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सर्वच नागरिकांना मतदानाचा हक्क बजावला आता 23 तारखेला या मतदारसंघातील महिलांनी नक्की कोणाला निवडून दिले हे समजणार आहे.