गुहागर ; अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी ,२५ हजार लिटर डिझेलसह २ कोटी ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
644
बातम्या शेअर करा

गुहागर – रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे पोलीस गस्त करीत असताना अंजनवेल जेटी किनारी रात्री अवैधरित्या एका मच्छिमारी बोटीतून डिझेलची तस्करी करत असताना मोटर व पाईपच्या साहाय्याने अवैध रित्या डिझेल तस्करी करीत असताना नऊ जणांना गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतले.या तस्करीसाठी वापरण्यात आलेले साहित्य मच्छिमारी बोट, बोटीवरील मोटर व पाईप, टँकर ,बलेनो कार ,मच्छिमार बोटीतून मोटर व साहित्य याच्या सहाय्याने २५००० लिटर डिझेल, आरोपीच्या ताब्यातील नऊ मोबाईल असे मिळून एकूण – २,०५,९५,००० ( दोन करोड पाच लाख पंच्याण्णव हजार) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच एकूण नऊ संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई चिपळूण डीवायएसपी राजमाने, एलसीबी.पीआय ढेरे व कर्मचारी गुहागर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सचिन सावंत व कर्मचारी, आदींनी यशस्वीरीत्या पार पाडली. गुहागर मधील ही सर्वात मोठी डिझेल तस्करी करणारी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here