मलकापूर – रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील ‘सड्याचा कडा’ याठिकाणी खोल दरीत आढळले दोन पुरूषांचे मृतदेह आढळल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आंबा घाटातील या खोल दरीत दाट झाडीत हे दोन पुरूषांचे मृतदेह आढळले आहेत.एकाचवेळी दोन मृतदेह आढळून आले असल्याने आत्महत्या की घातपात याबाबत तपास सुरू आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच देवरूख पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय पाटील सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत केली पाहणी; शाहूवाडी पोलीसही घटनास्थळी झाले दाखल
दोन्ही मृतदेह खोल दरीत असल्याने बाहेर काढण्यात येत होत्या मोठ्या अडचणी; अखेर विशेष मोहिम राबवून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात पोलीसांना आले यश आले असून या दोघांचा मृत्यू कशामुळे झाला? याचे कारण अद्याप गुलदस्त्यात; सध्या पोलीस तपास सुरू आहे.