खेड – मुंबई गोवा महामार्गावर गॅस लिकेज असलेला टँकर चालक बिनधास्तपणे चालवत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणे व्हायरल होत आहेत नागरिकांच्या जीवाशी खेळत हा टँकर कंपनीमध्ये आणणार आहे त्या टँकर चालकावर आणि कंपनीवर कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील लोटे येथील एमआयडीसी मध्ये असणाऱ्या घरडा केमिकल्स मध्ये हा टँकर आल्याचा खेड मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं ज्यावेळी हा टँकर गॅस लिकेज होता त्याचा पाठलाग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी केला. हा गॅस लिकेज असलेला टँकर घरडा केमिकल कंपनीमध्ये प्रवेश केला.कंपनी प्रशासनाने याबाबत बोलण्यास नकार देऊन कंपनीचे दरवाजे बंद केले. आणि अद्याप याबाबत कंपनी प्रशासनाने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
अशाप्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कंपनीवर आणि त्या टँकर चालकावर कारवाई व्हावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
 
             
		
