रत्नागिरी – रत्नागिरीत वकिली व्यवसाय करणारे मूळचे राजापुरचे असलेले ऍड. सौरभ सोहोनी यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी रत्नागिरी शहरातील खडपे वठार येथील किनाऱ्यावर त्यांचा मृतदेह सापडला. सौरभ सोहनी याने मोबाईल वर स्टेटस ठेऊन काल रात्री भाटे पुलावरून उडी मारून आत्महत्या असल्याचे त्यांच्या स्टेटस वरून निष्पन्न झाले.
सोमवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस पडत असताना सौरभ हा मोटरसायकलने भाटे पुलावर आला व तेथून त्याने समुद्रात उडी मारली आज सकाळी त्याचा मृतदेह खडपे वठारभागात आढळून आला. काल रात्री 9 ते 9.30 वाजण्याच्या दरम्यान ने ऍड. सौरभ सोहनी याने आपल्या मित्राची गाडी घेऊन जेवायला जातो म्हणून सांगून बाहेर पडला. त्याच दरम्यान सौरभ ने मोबाईलला “माझ्या मृत्यूला फक्त मी जबाबदार आहे… माझी शेवटची इच्छा म्हणून, कृपया माझ्या मित्रांची, माझ्या नातेवाईकांची, माझ्या रूम मेट ची, मी रहात असलेल्या मालकांची अथवा अन्य कोणाचीही कोणतीही चौकशी करू नये ही विनंती…!! क्षमस्व” हा स्टेटस ठेवला होता. त्याच्या मित्राची हा स्टेटस वाचल्यानांतर पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनीही तत्काळ मोबाईल लोकेशन तपासले. तेव्हा ते जिल्हा न्यायालयाच्या जवळपास लोकेशन दाखवत होते. सर्वांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता भाट्ये पुलावर त्यांना मोटरसायकल मिळाली. परंतु समुद्राला असलेले पाणी, प्रचंड अंधार आणि पाऊस यामुळे सौरभच्या नीट शोध घेता येत नव्हता. त्यात दुर्दैवाने आज सकाळी खडपे वठार समुद्रकिनारी सौरभ सोहनी याचा मृतदेह आढळून आला. सौरभ हा मनमिळावू स्वभावाचा होता त्याचा मित्र वर्ग मोठा होता सौरभने आत्महत्या का केली याबाबत पोलीस तपास सुरू केला आहे.