रत्नागिरी ; अखेर ‘आरजू’ च्या दोन संचालकांना पडल्या बेड्या

0
685
बातम्या शेअर करा

रत्नागिरी – दिल्लीपासून रत्नागिरीच्या गल्लीपर्यंत हजारो लोकांना फसवणाऱ्या ‘आरजू टेक्सोल कंपनी” प्रकाशात आलेल्या चार संचालकांपैकी दोघांना पकडण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले असून त्यातील एकजण दिल्लीपासून हरिव्दार,हैदराबाद असा फिरत असताना अखेरीस संगमेश्वर इथे त्याला पोलिसांनी अटक केली आहे. यातील सुत्रधारासह अद्याप एक फरार आहे.

आरजू टेक्सोल कंपनीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत दोन आरोपीत संचालकांना अटक केली आहे. यामध्ये संजय गोविंद केळकर (49, रा. घर नं. 350, अथर्व हॉटेल शेजारी, तारवेवाडी-हातखंबा रत्नागिरी) याला यापूर्वीच 26 मे रोजी अटक करण्यात आली होती. त्याला 31 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्या आली आहे. तर मंगळवारी प्रसाद शशिकांत फडके, (34, वर्षे, रा. घर नं. 72, ब्राम्हणवाडी, रामेश्वर मंदिराजवळ गावखडी रत्नागिरी) याला संगमेश्वर येथून अटक करण्यात आली. प्रसाद हा दिल्ली येथून हरिव्दार,हैदराबाद येथून रत्नागिरीत येत असताना त्याला संगमेश्वमध्ये पोलिसांनी अटक केली. त्याला ही 31 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या फसवणूकीच्या प्रकरणात 23 मे रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे भा.द.वि.सं. चे कलम 420 वगैरे अन्वये आरजू टेक्सोल कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या गुन्हयाची व्याप्ती लक्षात घेऊन अधिक तपास रत्नागिरी पोलीस दलाची आर्थिक गुन्हे शाखा (इकोनॉमिक ऑफेन्स विंग ) ह्यांच्याकडे देण्यात आला आहे. या प्रकरणामधील अन्य दोन संशयित आरोपीत नजरेआड आहेत. या प्रकरणात आजवर बळी पडलेल्या 115 लोकांचे जबाब नोंदविण्यात आलेले आहेत. मात्र या घोटाळ्याची व्याप्ती खूपच मोठी असून हजारो लोकांचे लाखो रुपये या मध्ये अडकले असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे यात केवळ रत्नागिरीतीलच गुंतवणूकदार नसून कुडाळ, सातारा सांगली येथील लोकांचाही सामावेश आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here