37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर पोलीस उपनिरीक्षक प्रमोद मोहिते आज सेवानिवृत्त

0
531
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक  प्रमोद पांडुरंग मोहिते हे आज आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. पोलीस खात्यात तब्बल 37 वर्षे सेवा करून आज ते या पदावरून निवृत्त होत आहेत.

प्रमोद पांडुरंग मोहिते हे 1988 साली पोलीस खात्यात रुजू झाले. त्यानंतर त्यांनी चंद्रपूर. गडचिरोली अशा नक्षलग्रस्त भागात आपली सेवा बजावली विशेष म्हणजे त्यांनी शरद पवार हे संरक्षण मंत्री असताना त्यांचा बॉडीगार्ड म्हणून कामही केल आहे. गेली पाच वर्ष ते गुहागर येथे कार्यरत असून गुहागर तालुक्यातील वाहतूक नियंत्रण विभाग व्यवस्थितपणे सांभाळत होते.त्यांच्यामुळे गुहागर तालुक्यातील शृंगारतळी या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेला मोठी शिस्तही लागली आहे. नुकताच एक मे कामगार दिनी त्यांना पोलीस उपनिरीक्षक या पदावर बढती मिळाली असून त्यांचे नियुक्ती ठिकाण है गुहागरच होते.
37 वर्षाच्या या प्रदीर्घ सेवेनंतर आज ते सेवानिवृत्त होत आहेत. गेली काही वर्ष गुहागर मध्ये त्यांनी आपली सेवा उत्तम दर्जाची केल्याने त्या अनेकांच्या मनात त्यांनी पोलिसांबद्दल एक वेगळी इमेज तयार केली आहे. आगामी काळातील त्यांच्या भावी वाटचालीसाठी गुहागर पोलीस स्टेशन मधील  सर्व कर्मचारी आणि तालुक्यातील मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here