गुहागर – गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील गोल्डन पार्क मैदानावर पार पडलेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा पर्व पहिले यामध्ये उस्मान इलेव्हन संघ अजिंक्य ठरला असून पिंट्या भाई इलेव्हन संघ उपविजेता ठरला आहे.
गुहागर तालुक्यातील सर्व खेळाडूंना एकत्र खेळण्यासाठी एखादे व्यासपीठ मिळावं या उद्देशाने ही चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा खेळवण्यात आली या स्पर्धेमध्ये एकूण दहा संघ सहभागी झाले होते तर 150 खेळाडूनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला या स्पर्धा लिग पद्धतीने खेळवण्यात आल्या या स्पर्धेमध्ये अंतिम सामना हा उस्मान इलेव्हन शृंगारतळी व पिंट्या भाई इलेव्हन देवघर यांच्यामध्ये झाला. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात उस्मान इलेव्हन अजिंक्य ठरला तर पिंट्या भाई इलेव्हन उपविजेता ठरला.
संपूर्ण स्पर्धेदरम्याने सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून यश लोखंडे पिंट्या भाई इलेव्हन संघ तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून सैफ भाटकर तर मालिकावीर म्हणून कुंदन रोहीलकर यांना गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी आदर्श युवा मंच काळसूरकौढर च्या सर्व सदस्यांनी मोलाचा सहभाग देऊन ही स्पर्धा अतिशय उत्तमरीत्या पार पडली.