खेड – मोदी, शाहांमुळे भाजपात आलो, पुन्हा-पुन्हा विश्वासघात झाला तर माझं नाव लक्षात ठेवा असं, म्हणत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवक निशाणा साधला आहे. लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे.
मोदी, शाहांमुळे भाजपात आलो, पुन्हा-पुन्हा विश्वासघात झाला तर माझं नाव लक्षात ठेवा असं, म्हणत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवक निशाणा साधला आहे. लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे.
रामदास कदम म्हणाले की, ज्या आमच्या विद्यमान जागा आहेत तिथे काही भाजपाच्या मंडळी आम्हीच उमेदवार आहोत असं सांगतायेत. तालुक्यात, मतदारसंघनिहाय जातात तिथे हे सुरू आहे ही माझी खंत आहे. रत्नागिरी, रायगड, मावळ, संभाजीनगर याठिकाणी हे सुरू आहे. हे जे चाललंय ते महाराष्ट्र भाजपाच्या माध्यमातून घृणास्पद सुरू आहे. मोदी-शाह यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान पकडले पाहिजेत. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा आहे. परंतु तुमच्यावर विश्वास ठेऊन जी लोक आलेत त्यांचा केसाने गळा कापू नका. भविष्यात तुम्ही यातून वेगळा संदेश महाराष्ट्राला देताय याचे भान भाजपाच्या लोकांना असणे गरजेचे आहे असंही कदमांनी म्हटलं.
तसेच मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने उघडपणे राष्ट्रवादीला मतदान केले. युती असतानाही गुहागरमध्ये मला भाजपाने पाडले. आम्ही इतका मोठा निर्णय घेतला, विश्वासाने भाजपासोबत आलो म्हणून मंत्रिमंडळ झाले. आता माझ्या मुलाच्या मतदारसंघात भाजपाचे चव्हाण आणि त्यांचे सहकारी निधी आणून भूमिपूजन करून स्थानिक आमदाराला बाजूला ठेवतायेत. हेतूपुरस्पर त्रास दिला जातोय असा आरोप रामदास कदमांनी केला.
दरम्यान, हे असेच सुरू राहिले तर भविष्यात भाजपावर कुणी विश्वास ठेवणार नाही. याची दखल भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर घेतली पाहिजे. मोदी-शाह यांच्यावर विश्वास ठेऊन आम्ही आलोय. मागच्यावेळी काय झाले ते झालं, पण पुन्हा पुन्हा आमचा विश्वासघात झाला तर माझेही नाव रामदास कदम आहे. मीदेखील शिवसेनेचा नेता म्हणून २५ वर्ष काम करतोय. अधिक आज बोलणार नाही. जेव्हा लोकसभेच्या उमेदवारी जाहीर होतील तेव्हा माझे वैयक्तिक मत काय आहे हे मांडेन असं सांगत कदमांनी भाजपाला थेट इशारा दिला आहे.