गुहागर – गुहागर तालुक्यातील गुहागर अंजनवेल या मार्गावरील बाग येते भरधाव वेगातील दुचाकी एसटीवर आढळून तरुणाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गुहागर आगारातून सुटणारी गुहागर वेलदूर ही गाडी वेलदूर कडे जात असताना बाग येथे आली असता रानवी परिसरातून दुचाकी वर ट्रिपल सीट येणाऱ्या मुलांचा दुचाकी वरील कंट्रोल सुटला आणि त्यांची एसटीला धडक बसली ही धडक एवढी जबरदस्त होती की त्यामधील एका व्यक्तीला जबरदस्त मुका मार लागला तात्काळ तेथील ग्रामस्थांनी त्या जखमी व्यक्तींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केल मात्र त्या ठिकाणी त्या तरुणाचा दुर्दैवी रित्या अंत झाला शुभम कदम नावाचा हा तरुण रानवी येथील असून तो काही कामानिमित्त गुहागर कडे येत असताना हा अपघात झाला घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा करण्याचं काम सध्या सुरू आहे