गुहागर – गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी यावर्षी होणारी चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेमध्ये खेळाडूंचा जो लिलाव झाला त्या लिलावात सगळ्यात महागडा असा खेळाडू हा झोंबडी येथील अवधूत सकपाळ ठरलाय या खेळाडूला सगळ्यात जास्त बोली लावत पिंट्या भाई -11 देवघर संघाने आपल्या संघात घेतले आहे.
गुहागर तालुक्यातील तरुण खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळावं त्यांचा खेळ अधिक भरत जावा यासाठी आदर्श युवामंच काळसूर कौंढर यांच्या वतीने चॅम्पियन ट्रॉफी 2024 चे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत एकूण दहा संघ असतील तालुक्यातील या दहा संघांमध्ये ज्यावेळेला खेळाडू निवडले गेले हे सर्व आयपीएलच्या धर्तीवर लिलाव करून निवडले गेले. या दहा संघासाठी ज्यावेळी लिलाव सुरू होता त्यावेळेला प्रत्येक संघ मालकाकडे सहा हजार पॉईंट देण्यात आले होते. सहा हजार पॉईंट्स मध्ये 15 खेळाडू खरेदी करणे गरजेचे होते. लिलाव सुरू होत असतानाच प्रत्येक खेळाडू आपल्या संघात असावा यासाठी सर्वच दहा संघात चढाओढ पाहायला मिळाली. याचवेळी तालुक्यातील झोंबडी येथील अवधूत सकपाळ हा अष्टपैलू खेळाडू सगळ्यात जास्त पॉईंट ने म्हणजे 2050 पॉईंट ने खरेदी केला गेला. त्यामुळे सगळ्यात महागडा खेळाडू म्हणून त्याची या स्पर्धेत निवड झाली 4 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार असून या स्पर्धेत प्रत्येक संघाला चार लीगच्या मॅचेस खेळावे लागणार आहेत. ही स्पर्धा शृंगारतळी येथील भव्य दिव्य अशा मैदानावर होणार आहे.