सांगली ; त्यांनी दाखवला अपघात ,मात्र पोलीस चौकशीत निघाला खुनाचा प्रकार अविनाश पाटील यांची दमदार कामगिरी

0
327
बातम्या शेअर करा

सांगली – एखाद्या सिनेमात शोभेल असाच प्रकार सांगलीमध्ये घडला मात्र सुतावरून स्वर्ग गाठण्याची जी कला सांगली पोलिसांना आहे. त्याच कलेचा वापर करत सांगली पोलिसांनी या खुनाचा शोध लावला.

रागाच्या भरात तिघांनी त्याला मारले, जखमी अवस्थेत टाकून अपघाताचा बनाव केला. तो मृत झाल्यानंतर तिघांना वाटले खून पचला. परंतु, कुपवाडचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील आणि पथकाने अपघाताचा कसून तपास केला. परिसरात कोठेच अपघात झाला नव्हता. त्यामुळे तपासाची चक्रे फिरवली. तिघा संशयितांची स्वतंत्र चौकशी केली. अपघाताचे वेगवेगळे ‘स्पॉट’ दाखवले. पोलिसी खाक्या दाखवताच खुनाची कबुली दिली.

अविनाश पाटील

मुळचा कोल्हापूर येथील लतीफ मुबारक सदलगे हा कुपवाडला फॅब्रिकेशन कारखान्यात कामास होता. याच कारखान्यात संशयित सचिन संजय ढेकळे, किरणकुमार श्रीमहातराय काम करत होते. एके दिवशी लतीफने सचिनच्या आईला पाहून किरणकुमार समोर अपशब्द वापरले. किरणकुमारने सचिनला हा प्रकार सांगितला. आईला अपशब्द वापरल्याचे ऐकून सचिनच्या रागाचा पारा चढला.

सचिन, किरणकुमारने मंगळवारी, दि. १३ रोजी रात्री लतीफला दुचाकीवर बसवून कवलापूर विमानतळाच्या माळावर नेले. जवळच बीअर बारमध्ये मद्यपान केले. सचिनचा मित्र स्वप्निल ऊर्फ गोठ्या तेथे आला. मद्यपानानंतर चौघेही विमानतळावरील मोकळ्या जागेत आले. तिघांनी लतीफला सचिनच्या आईबद्दल अपशब्द का वापरलेस म्हणून जाब विचारत शिवीगाळ केली. लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तेवढ्यात सचिनने दगड उचलून लतीफच्या डोक्यात घातला. जखमी लतीफला दुचाकीवर
बसवून कुपवाडला कारखान्याजवळ आणून टाकून दिले. सचिनने मालकाला मोबाइलवर लतीफ दारू पिऊन सावळी रस्त्यावर दुचाकीवरून पडून जखमी झाल्याचे सांगितले.

मालक व कामगार सुफियाना शेख कारखान्याजवळ येऊन जखमी लतीफला सिव्हिलमध्ये दाखल केले. बुधवारी त्याचा मृत्यू झाला. अपघाती मृत्यूबाबत सहायक निरीक्षक अविनाश पाटील आणि पथकाने चौकशी सुरू केली. सावळी रस्त्यावर कोठेही अपघात झाल्याची तसेच अपघाताबाबतच्या खाणाखुणा आढळल्या नाहीत. सुफियानाला अपघाताबाबत विचारल्यानंतर त्याने सचिनने अपघाताची माहिती दिल्याचे सांगितले. इकडे लतीफचा मृत्यू झाल्याचे ऐकून सचिन, किरणकुमार व स्वप्निल सावध बनले होते. पोलिसांनी तिघांना तपासासाठी बोलवले. तिघांची स्वतंत्र चौकशी केल्यानंतर वेगवेगळी माहिती पुढे आली. तिघांनी अपघाताचे वेगवेगळे स्पॉट दाखवले. पोलिसांनी याची विचारणा केल्यानंतर दारूच्या नशेत असल्याचे सांगितले. परंतु, पोलिसांनी चौकशीचा फास आवळला तशी तिघांनी लतीफला मारहाण केल्याची कबुली दिली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here