चिपळूण – भाजपचे माजी खासदार निलेश राणे आज गुहागर येथे जाहीर सभा घेणार होते त्यासाठी ते चिपळूण येथून गुहागर कडे प्रस्थान करत असतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर भाजप आणि भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक झाली परिणामी त्या ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी अश्रू धुळकांडीच्या नळ्याचा वापर केला आणि कार्यकर्त्यांना पांगवले मात्र असं असलं तरी दोन्ही बाजूने जोरदार दगडफेक झाली यामध्ये दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या या ठिकाणी वातावरण तापले असून पोलीस घटनास्थळी असून हे वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
चिपळुण येथे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर ही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे चिपळुणात जोरदार राडा झाला असून, राणे आणि जाधव यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. या राड्यामुळे जमलेला जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला आहे.
आमदार भास्कर जाधव यांनी अलिकडेच उद्धव ठाकरे यांच्या कणकवली दौऱ्याप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे संतापलेले माजी खासदार नीलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भास्कर जाधव यांच्यावर सणसणीत टीका केली. त्यांचा समाचार घेण्यासाठी आपण त्यांच्या मतदार संघातच सभा घेऊ आणि तेथेच बोलू, असे त्यांनी जाहीर केले. त्यानुसार आज शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता त्यांची शृंगारतळी (ता. गुहागर) येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.