खेड:- माजी खासदार निलेश राणे व आमदार भास्कर जाधव यांचेत राजकिय वाद असल्याने त्यांचे दौ-या दरम्याने अनुचित प्रकार घडू नये याकरीता चिपळूण रेस्ट हाउस, आमदार भास्कर जाधव यांचे संपर्क कार्यालय व निवासस्थान, पागनाका परिसर, पॉवर हाउस नाका, गुहागर बायपास रोडवरील देसाई बाजार परिसर येथे बंदोबस्त परिसर येथे बंदोबस्त नेमण्यात आला होता.
निलेश राणे यांच्या मिरवणुकी वेळी अचानक दगडफेक सुरू झाली. त्या दगडफेकीमध्ये माजी खासदार निलेश राणे यांच्या ताफ्यातील वाहनांच्या काचा, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या चारचाकी व दूचाकी वाहनांच्या काचा फोडून तसेच रस्त्या लगत असलेल्या दुकानांचे नुकसान केले. तसेच कार्यकर्त्यांकडून झालेल्या दगडफेकीमध्ये काही पोलीस दिपक ओतारी , वेदा संतोष मोरे भुषण सावंत फणसे यांना झालेल्या दगडफेकीमध्ये दगड लागुन किरकोळ दुखापत केलेली आहे. तरी दिनांक 16/02/2024 रोजी सायंकाळी 17.15 वा चे सुमारास ते 18.00 वा चे मुदतीत मुंबई गोवा महामार्गावरील पागनाका ते गुहागर बायपास फाटा दरम्याने आमदार भास्कर जाधव यांचे शिवसेना संपर्क कार्यालयासमोर मागील राजकिय वादावरुन अंदाजे 350 ते 400 कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर विनापरवाना जमाव जमवून अचानक मोठमोठ्याने शिवीगाळ, घोषणाबाजी व दगडफेक करुन माजी खासदार निलेश राणे यांच्या ताफयातील वाहनांच्या काचा, तसेच रस्त्यावर पार्क करणेत आलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांच्या काचा, रस्त्याच्या बाजुस असलेल्या दूकानांचे नुकसान केले. तसेच त्यांनी केलेल्या दगडफेकीमध्ये वर नमुद पोलीस अंमलदारांना दगड लागुन दुखापत होण्यास कारणीभुत होवून सरकारी कामात अडथळा निर्माण केला शासनाच्या वतीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हामध्ये आज न्यायालयाने रवींद्र शिवाजी सुर्वे, धाकटू गणपत खताते, उमेश धाकटू खताते, सुमित सुरेश शिंदे, शशिकांत श्रीकांत मोदी, शशिकांत सुधाकर साळवी, धनंजय चंद्रकांत अंबुर्ले, विजय श्रीपत साळवी, संदीप कृष्णा चव्हाण, जितेंद्र लक्ष्मण चव्हाण, विनोद लक्ष्मण झगडे, बशीर शरफुद्दीन चौगुले, राकेश पांडुरंग शिंदे याना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
सदर अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावरती आजरोजी खेड जिल्हा व अति सत्र न्यायालयात सुनावणी होऊन वरील सर्वांना अंतरिम अटकपूर्व जामिन मंजूर करण्यात आला आहे खेड जिल्हा व सत्र न्यायालयात जेष्ठ वकील अँड नितीन केळकर, अँड सोहम भोजने, अँड ऋषिकेश थरवळ यांनी काम पाहिले.