चिपळूण ; मार्गताम्हाने बाजारपेठेतील स्वच्छतागृह बंद..

0
230
बातम्या शेअर करा

मार्गताम्हाने- चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने बाजारपेठेत बस थांब्याच्या मागे असलेले स्वच्छतागृह बंद करण्यात आले आहे.

स्वच्छतागृहातील मैलाची टाकी तुंबल्याने दुर्गंधी सुटून आरोग्याचा प्रश्न
उद्भवू नये म्हणून ग्रामपंचायतीने हे स्वच्छतागृह बंद करण्याचा निर्णय
घेतला असून ग्रामपंचायत मालकीच्या असलेल्या स्वच्छतागृहाचा वापर करावा,असे आवाहन सरपंच प्रभाकर चव्हाण यांनी केले आहे.

चिपळूण-गुहागर मार्गावरील मार्गताम्हाने हे गाव मध्यवर्ती असून सुमारे 20 गावांची बाजारपेठ आहे. शासकीय कार्यालये, मच्छी व मटण मार्केट, सर्व प्रकारची दुकाने असल्याने येथे नेहमीच बाहेरील नागरिकांची वर्दळ असते. येथील बस थांब्याच्या मागे ग्रामपंचायतीचे स्वच्छतागृह असून ते अलिकडे तुंबले आहे. मैलाची टाकी तुंबल्याने व त्यातच नजीकच्या नाल्यात काही खाणावळी मालक गटाराचे पाणी सोडत असल्याने कचरा साचून दुर्गंधी सुटत असल्याने परिसरातील नागरिक, व्यापारी यांना याचा मोठा त्रास होत असे.
काहींनी ग्रामपंचायतींकडे लेखी तक्रारीही केल्या आहेत. त्यामुळे
ग्रामपंचायतीने हे स्वच्छतागृह बंद केले असून ग्रामपंचायत मालकीचे ग्रामपंचायत इमारतीच्या कडेला असलेल्या स्वच्छतागृहाचा वापर करावा, असे सर्वांना सूचित करण्यात आले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here