गुहागर – बंदरात नांगरुन ठेवलेल्या दर्याचा राजा या नौकेला
पहाटे अचानक लागून यामध्ये असणारे सर्व साहित्य जळून सुमारे ५ लाखाचे नुकसान झाले. नौकेत सौर पँनेल व बँटरी असल्याने त्यांच्या स्फोटाने आग लागली असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
गुहागर तालुक्यातील अंजनवेल बंदरात नौकामालक श्रीमती रंजना कृष्णा पडवळ यांची आयएनडी-एम.एच-४ – एमएम- ४८८३ या क्रमांकाची दर्याचा राजा नावाची नौका नांगरुन ठेवण्यात आली होती. दि. २० डिसेंबर रोजी पहाटे ३.३० च्या दरम्यान या नौकेला आग लागल्याचे गावातील ग्रामस्थांच्या लक्षात येता आग
विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. नौकेचा नांगर तुटून नौका
समुद्रामध्ये वाहून आज असता अन्य नौकेच्या सहाय्याने किनारी आणण्यात आले.आगीच्या प्रादूर्भावामुळे नौकेचे व इंजिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नौकेत सोलर पँनेल, बँटरी, मासेमारी जाळी, रस्सी व तत्सम साहित्य होते.
दरम्यान, सकाळी ९ वाजता गुहागर सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी उपसरपंच बाळकृष्ण सुर्वे, पोलीस पाटील अरविंद पड्याळ यांच्यासह संतोष कांबरे, जयवंत सैतवडेकर, सुभाष नरवणकर या मच्छिमार ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचनामा केला.