कोकणी कार्टी चा कलाकार अमित कुबडे रील टू रिअल’ या पुरस्काराने सन्मानित

0
456
बातम्या शेअर करा

गुहागर – मुंबई येथे पार पडलेल्या कोकण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त गुहागर तालुक्यातील जानवळे येथील कोकणी कार्टी या यूट्यूब चैनल मधील अमित कुबडे याला रील टू रिअल’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या मिळालेल्या पुरस्काराने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासह गुहागर तालुक्यातून कौतुक आणि अभिनंदन याचा वर्ष होत आहे.

मुंबई- दादर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात डिजिटल सोशल चेंज मेकर म्हणजेच टॉप १२ रील स्टारना ‘रील टू रिअल’ या पुरस्काराने दीपा परब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यात गुहागर तालुक्यातील जानवळे येथील कोकणी कार्टीचा कलाकार अमित कुबडे,सई उतेकर, तन्मय पाटेकर, बिनधास्त गर्ल गौरी पवार, रोशन पुजारी, किरण पास्ते, सायली इंदुलकर, साहिल दळवी, प्रथमेश कदम, निखिल सकपाळ, अनमोल यादव, अंकिता प्रभू वालावलकर यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. अमेय देसाई यांच्या हस्ते शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी आणि आपले ध्येय गाठण्यासाठी कार्यरत असणाऱ्या महिलांचा ‘झिरो टू हिरो’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

गुहागर तालुक्यातील एका छोट्याशा गावांमधून काही तरुण युवकांनी एकत्र येत कोकणी कार्टी हे यूट्यूब चैनल सुरू केलं यामध्ये कोकणातील ग्रामीण भागातील अनेक किस्से अमित कुबडे यांनी प्रितेश राहटे व त्यांच्या अनेक सह कलाकारांसोबत सादर केले आहेत. त्यांची ही कला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही होते. त्याच्या या कलेचे महाराष्ट्र सह संपूर्ण देशभरात कौतुक होत आहे. कोकणी कार्टी या नावाने प्रसिद्ध असलेल्या युट्युब चॅनेल वर त्याच्या अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होऊन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या मधील राजेश म्‍हादलेकर ,सुदीप तुप्ते, दीपक रहाटे, प्रमोद रहाटे, सिद्धेश रहाटे, अक्षय म्‍हादलेकर ,अंकित म्‍हादलेकर ,सिद्धेश म्‍हादलेकर ,अवधूत म्‍हादलेकर ,यश रहाटे , रोहित म्हादलेकर,राकेश रहाटे ,स्वप्नील तुप्ते, सोहम महाडिक,प्रतीक बेंद्रे,संजय तुप्ते,सुरेश म्हादलेकर, परशुराम रहाटे,सोनाली म्हादलेकर , सागर कांबळे आधी कलाकार आपली कला सादर करत असतात.कोकणी कार्टी मधील या कलाकाराला मिळालेल्या या पुरस्काराने सध्या सर्वत्र त्याच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत असून कौतुकही केले जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here