दापोली – रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत कुणबी मराठा कोकणातील पहिली नोंद अढळून आली आहे.
शासनाच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच तहसीलदार कार्यालयात कुणबी मराठा जात नोंद शोध मोहीम सुरू आहे. .
कोकणात मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे.परंतु कोकणातील मराठा हा कुणबी मराठा नसल्याचे बोलले जात होते. कोकणातील मराठा समाज कुणबी प्रमाण पत्र घेणार नसल्याचे नेत्यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यावरून मोठा वाद सुद्धा पेटला होता.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यांतील कांगवाई गावातील महसुली जन्म मृत्यू नोंद दप्तरात 1965 साली गंगाराम सखाराम घाग यांची कुणबी मराठा अशी नोंद आढलून आली आहे. तसेच पोफलवणे गावातील दौलत धोंडू मोरे यांची कुणबी मराठा अशी नोंद आढळून आली आहे. अशी माहिती दापोली महसूल विभागाच्या कार्यालयातून देण्यात आली.