सांगली. – सांगली येथील कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांचे पुणे येथे अप्पर पोलीस निरीक्षक महासंचालकांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धीचा पुरस्कार देण्यात आला.
सांगली शहरातील महत्त्वाचे असे कुपवाड एमआयडीसी पोलीस स्थानक या पोलिस ठाण्याच्या अंतर्गत 302 खुनाच्या गुन्ह्यात योग्य तपास केल्याबद्दल सप्टेंबर 2022 या वर्षांमधील सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धीचा पुरस्कार देण्यात आला.
अविनाश पाटील यांनी या पोलिस स्थानकाचा कारभार स्वीकारताच गेल्या काही वर्षात या परिसरातील 302 या खुनाच्या गुन्ह्यातील अनेक आरोपींना योग्य रीतीने तपास करून अटक केले आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील गणेश उत्सवाच्या काळात काही सार्वजनिक आणि सामाजिक उपक्रमही राबवले त्यामुळे येथील कायदा आणि सुव्यवस्था सुद्धा सुधारण्यास मदत झाली. अनेक वेळा समाजातील अडलेल्याआणि गरजवंतुना ते नेहमीच सहाय्य करत असतात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचं या परिसरात नावलौकिक आहे. या आधी सुद्धा मुंबई येथील बदलापूर या ठिकाणी कार्यरत असताना त्यांनी धडाकेबाज कारवाई केल्या आहेत व अनेक आरोपींना गजाआड सुद्धा केले आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे सुरुवातीला नियुक्त होत त्यांनी त्या परिसरात सुद्धा अनेक धडाकेबाज कारवाई करत या परिसरात एक दरारा निर्माण केला होता.त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे व त्यांना मिळालेल्या पुरस्काराचे बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.