बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण नगरपालिकेने नुकतीच शहरातील अतिक्रमण करणाऱ्या टपरीधारकांवर कारवाई केली. या कारवाईनंतर शहरातील रस्ते सध्यातरी प्रशस्त असे दिसत आहेत. चिपळूण नगरपालिकेने केलेल्या कारवाईबद्दल चिपळूण नगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचे नक्कीच कौतुक आणि अभिनंदन होत आहे. माञ नगरपालिकेने केलेल्या कारवाईनंतर आता प्रश्न उठतोय तो चिपळूण नगरपालिका शहरातील मोठे व्यावसायिक धारक आणि अतिक्रमण केलेल्या बिल्डिंगवर कारवाई कधी करणारं …….नाही तर चिपळूण नगरपालिकेची कारवाई म्हणजे गरिबांवर कारवाई आणि बड्या व्यवसायिकांना सूट अशी चर्चा चिपळूण शहरात रंगू लागली आहे.

सुंदर आणि निसर्गरम्य अशा या चिपळूण शहरात अनेक पर्यटक आणि अनेक नागरिक नेहमी येत असतात. मात्र याचवेळी वाहतुकीला अडथळा होणाऱ्या स्थितीत अनेक रस्त्यावर व्यापारी, टपरीधारक आपले दुकान थाटून बसत होते. त्यामुळे चिपळूण नगरपालिकेने अखेर मनावर घेत येथील अतिक्रमण हटवले आणि रस्ते मोकळे केले. मात्र आता चिपळूण नगरपालिकेने तेवढीच धडाकेबाज कारवाई चिपळूण शहरातील अनाधिकृत बांधकामावर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

चिपळूण नगरपालिकेने अतिक्रमणावर केलेल्या कारवाईबद्दल एकीकडे नागरिक आनंद आणि कौतुकही करतात मात्र त्याचवेळी चिपळूण नगरपालिका ही शहरातील अनधिकृत बांधकाम आणि मोठ्या व्यवसायिकांच्या अतिक्रमणांवर कारवाई करणार का .? असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जात आहे.

चिपळूण नगरपालिकेचे मुख्य अधिकारी प्रसाद शिंगटे हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे लवकरच ते चिपळूण शहरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करतील अशी अपेक्षा व्यक्त करूया.

काही वर्षांपूर्वी चिपळूण नगरपालिकेमध्ये राठोड नामक मुख्य अधिकारी कार्यरत होऊन गेले त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये शहरातील अनेक अतिक्रमणे धडाकेबाज कारवाई करून हटवली होती तशीच कारवाई प्रसाद शिंगटे यांनी करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here