खेड ; अमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीला खेड पोलिसांनी घेतले ताब्यात

0
495
बातम्या शेअर करा

खेड – रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थ विकणाऱ्यांची टोळी असल्याची शंका पोलिसांना होती गेले काही दिवस पोलीस या टोळीच्या मार्गावर होते. त्यातच खेड पोलिसांनी शिवफाटा टोलनाका येथे अनिल शिवराम चव्हाण ऊर्फ अनिल बुवा याला “गांजा” हा अंमली पदार्थ विक्री करत असल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र त्याला हा गांजा पुरवणारा आरोपी संतोष काळे याला सोलापुर येथुन ताब्यात घेण्यास खेड पोलिसांना यश आले त्यामुळे खेड पोलिसांचे सध्या सर्वत्र कौतुक होते

अनिल शिवराम चव्हाण याला सदरचा “गांजा” हा अंमली पदार्थ विक्री करिता सोलापूर जिल्ह्यामधील राहणार संतोष पुंडलिक काळे राहणार पंढरपूर ही व्यक्ती पुरवीत असलेबाबत निष्पन्न झाले आहे.

अंमली पदार्थ विक्रीतील आरोपी हे अत्यंत सतर्क असल्याचे व ते त्यांचे साथीदारांची साखळी निर्माण करून अश्या प्रकारचा व्यवसाय करीत असल्याचे अनेकदा दिसून आलेले आहे. त्यांचा व्यवसाय सुकर होण्यासाठी ते बातमीदार देखील नेमत असल्याचे व त्यांच्या या गुन्हेगारी कृत्याच्या साखळीतील एखादा साथीदार पोलीसांच्या तावडीत सापडल्यास त्याबाबतची माहिती ते लगेच प्राप्त करून अत्यंत सावधगिरी बाळगून नजरेआड होण्याची देखील दाट शक्यता नाकारता येत नाही.
या गुन्ह्यातील सहआरोपी संतोष पुंडलिक काळे यास गुन्ह्यात अटक करणे कामी खेड पोलीस ठाण्या मार्फत वेगवेगळ्या वेळी पोलीस पथक पाठविण्यात आले होते परंतु या गुन्ह्यामधील सह आरोपी संतोष पुंडलिक काळे हा देखील, गुन्हा घडल्यापासून असाच सुमारे 4 महीने पोलीसांच्या नजरेआड झाला होता आणि तो देखील आपल्या संपूर्ण परिवारासह! मात्र अखेर खेड पोलिसांना त्याला ताब्यात घेण्यात यश आले. सदरची कारवाई, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी जयश्री गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी खेड राजेद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर, अजय कडू व वैभव ओहोळ यांनी पार पाडली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here