गुहागर – पंचायत समिती गुहागरच्यावतीने तालुकास्तरीय दिव्यांग कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार पंचायत समिती सेस ५ टक्के दिव्यांग कल्याणकारी योजनेतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिविर गुहागर ग्रामीण रुग्णालय येथे पार पडले. ३५० हुन अधिक दिव्यांगानी शिबिरात सहभाग घेतला होता.
या दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे व गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचे मनोविकार तज्ञ डॉ.अमित लवेकर, नेत्ररोगतज्ञ डॉ. वनिता कानगुळे, अस्थिरोग तज्ञ डॉ. अमरीश आगाशे, बुध्यांक तपासणी तज्ञ डॉ. प्रमोद शाक्य, भौतिक उपचार तज्ञ डॉ. अमित वायंगणकर, व्यवसाय उपचार तज्ञ डॉ. कुणाल देसाई, गुहागर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक व बालरोगतज्ञ डॉ. बळवंत एस. के. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. घनश्याम जांगिड, नेत्ररोग तज्ञ डॉ. दिनेश जोशी, गुहागर तालुका अपग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग, पत्रकार गणेश किर्वे, आरे ग्रामपंचायतचे सरपंच समीत घाणेकर, कृषी विस्तार अधिकारी राजकुमार धायगुडे आदी मान्यवरांसह सरपंच, उपसरपंच सदस्य पंचायत समितीचे सर्व अधिकारी, ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी व कर्मचारी,आशा सेविका, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायतचे सर्व डाटा ऑपरेटर उपस्थित होते. या शिबिरामध्ये अस्थिव्यंग, बहुविकलांग, कुष्ठरोग, बुटकेपणा, मज्जातिव्र आजार, कंपावत रोग अंध, अंशत: अंध दृष्टीदोष मतिमंद मानसिक आजार, अविकसित स्वमग्न, बालरोग, सेलेब्रल पाल्सी अध्ययन क्षमता आदींची तपासणी करण्यात आली. दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिरासाठी पंचायत समितीतील सर्व अधिकारी, कर्मचारी,आरोग्य विभाग कर्मचारी,शिक्षण विभाग कर्मचारी,सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, गुहागर ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली. दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिरासाठी उपस्थित असलेल्या दिव्यांग व त्यांचे सहकारी यांच्यासाठीचहापाणी, बिस्कीट, नाष्टा व अल्पोपहारची व्यवस्था पंचायत समिती गुहागरच्या वतीने करण्यात आली होती. सर्व प्रकारच्या दिव्यांगांना चांगली सोयी सुविधा यावेळी देण्यात आल्याने सर्व दिव्यांग व त्यांचे सहकारी नातेवाईक नातेवाईक यांनी पंचायत समिती गुहागर यांच्या आभार व्यक्त केले.