गुहागर ; विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना टेम्पो घुसल्याने दोन जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी

0
4848
बातम्या शेअर करा

गुहागर – राज्यभरात मोठ्या आनंदात गणपतीचा विसर्जन होत आहे .मात्र याचवेळी गुहागर मध्ये या विसर्जनाला गालबोट लागले आहे. गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना घडली या मिरवणुकीत ब्रेक फेल झालेला टेम्पो घुसल्याने 15 पेक्षा जास्त जण जखमी झाले असून सतरा वर्षाच्या मुलीसह गावच्या उपसरपंचाचा मृत्यू झाला आहे.

गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर गावात विविध घरातील गणपतीचे सामुहिक विसर्जन केले जाते. आज सायंकाळी विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. ही मिरवणुक वाजतगाजत विसर्जन घाटाकडे जात होती. याचं वेळी मिरवणुकीत गणपती ठेवलेल्या एका टेम्पोचे ब्रेक फेल झाले आणि हा टेम्पो मिरवणुकीत नाचणाऱ्या गणेशभक्तांमध्ये घुसला. त्यामध्ये कोमल भुवड व दिपक भुवड हे दोघे टेम्पोखाली चिरडून जागीच मृत्युमुखी पडले. तर 15 जण जखमी झाले सर्व जखमींना आबलोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्रथम उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

हा अपघात झाल्याची माहिती कळतात गुहागर शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत व स्थानिकांच्या मदतीने गुहागर पोलीस ही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र राजमाने हे सुद्धा तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेबाबत अधिक तपास आणि माहिती घेत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here