गुहागर ; एसटी कामगार नेते सुभाष पावसकर आज सेवानिवृत्त

0
541
बातम्या शेअर करा

सुभाष पावसकर हे मूळचे गुहागर तालुक्यातील कोंडकारूळ येथील रहिवासी मात्र कामधंदा निमित्त गेली 21 वर्ष ते चिपळूण तालुक्यातील रामपूर येथे वास्तव्य करतात.
1989 मध्ये एसटी महामंडळात रुजू झालेले सुभाष पावसकर त्यानंतर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवत अखेर गुहागर येथे आज सेवानिवृत्त होणार आहेत. रत्नागिरी ,चिपळूण या ठिकाणी आपल्या सेवा बजवत असताना त्यांनी अनेक कामगारांना आपल्या परीने योग्य ती मदत केली त्यामुळे ते अनेक वर्ष कामगार संघटना व कामगार सेना या संघटनेत मोठ्या पदावर कार्यरत होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यात ते नेहमीच अग्रेसर होते.त्यामुळे अनेक ठिकाणी असणाऱ्या एसटीच्या समस्या त्यानी प्रशासना पुढे मांडत त्या सोडवल्या असल्याचं अनेक कामगार आजही सांगतात आज ते सेवानिवृत्त होत असल्याने गुहागर आगारासमोरील हॉटेल मानस येते एका छोट्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सुभाष पावसकर यांचा एसटी कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्त निमित्त सत्कार करण्यात येणार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here