राष्ट्रवादीचा हा नेता ; काल अजित पवार यांच्यासोबत तर आज शरद पवार यांच्यासोबत ….

0
621
बातम्या शेअर करा

पुणे – राज्यातील राजकारणात अजित पवार यांनी मोठा भूकंप घडवून आणला. रविवारी दुपारी त्यांनी आपला वेगळा गट तयार करत राज्यातील सत्तेत वाटा मिळवला. त्यांच्यासोबत नऊ आमदारांनीही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक जण होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील खासदारसुद्धा होते. परंतु आता शरद पवार पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या सर्वच नेत्यांना फोन केले आहे. शरद पवार यांचा मैदानात उतरल्याचा परिणाम दिसून येत आहे. काल अजित पवार यांच्यासोबत असलेला खासदार आता शरद पवार यांच्यासोबत आला आहे.

कोण आले शरद पवार यांच्यासोबत
अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेला खासदार काही तासांत शरद पवार यांच्या गटात आला आहे. शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे आता शरद पवार यांच्यासोबत आले आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. अमोल कोल्हे यांनी लिहिलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं।” मी साहेबांसोबत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here