गुहागर – गुहागर तालुक्यातील देवघर येथे सप्तेश्वर प्रतिष्ठानने नुकतेच वृक्षारोपण केले. यावेळी जवळपास 500 नवीन वृक्ष लावण्याचा संकल्प सोडण्यात आला.

सप्तेश्वर प्रतिष्ठान देवघर हे नेहमीच विविध उपक्रम राबवत असते यावर्षी गुहागर -चिपळूण मार्ग तसेच देवघर ते देवघर सहण या रस्त्याशेजारी झाडे लावण्याचा संकल्प प्रतिष्ठानने ठरवला होता. त्याचप्रमाणे त्यांनी या रस्त्याच्या शेजारी वृक्षारोपण केले या वृक्षारोपणासाठी गुहागरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे तसेच देवघर ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच विशाखा जाधव सप्तेश्वर प्रतिष्ठानचे अनेक मान्यवर आणि गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.